छत्रपती संभाजीनगर : छावणी परिषदेच्या वतीने मिल्ट्री मसे ते एमएच हॉस्पिटलपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा रस्ता २२ जानेवारीपासून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. वाहनचालकांनी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग:
1. इंग्रजी होलीक्रॉस शाळा: छावणीत एमएसईबी कार्यालयाकडून जाणारा रस्ता.
2. आयकर भवन ते सरकारी दवाखाना: छावणी मार्ग एमएसईबी कार्यालयाकडे जाणारा रस्ता.
3. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी: नगर नाका ते छावणी पाण्याची टाकीमार्गे मिलिंद चौकाकडे जाता येईल.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सुकर प्रवासासाठी नागरिकांनी या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*