छत्रपती संभाजीनगर : पावसाळा प्राणी व पक्ष्यांच्या प्रजननासाठी (मॅटिंग पिरियड) अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. या काळात वन्यजीव अधिक संवेदनशील व आक्रमक होतात. पर्यटकांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीला व्यत्यय येतो, आणि हल्ल्याचा धोका वाढतो. त्यामुळे गौताळा अभयारण्य वन विभागाच्या आदेशानुसार जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वसलेले गौताळा अभयारण्य सन १९८६ मध्ये स्थापन करण्यात आले. सुमारे २६० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या अभयारण्यात १७ गावांतील वनक्षेत्राचा समावेश आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेले हे अभयारण्य पावसाळ्यात अत्यंत आकर्षक रूप धारण करते. मात्र, दरवर्षीप्रमाणेच यंदाही प्रजनन काळातील संवेदनशीलतेचा विचार करता, पर्यटनावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांनी या निर्णयाचे स्वागत करत, निसर्गाच्या या नैसर्गिक प्रक्रियेला सहकार्य करणे गरजेचे आहे. काही पर्यटकांनी मात्र अभयारण्य बंद राहिल्यामुळे हिरमोड झाल्याचे सांगितले. तथापि, वन विभागाच्या मते हा निर्णय वन्यजीवांच्या संवर्धनासाठी अत्यावश्यक आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,406 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क