छत्रपती संभाजीनगर :  माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपांदरम्यान वापरलेले आक्षेपार्ह शब्द आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारे ठरल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर “आंबेडकरी समाजाने आणखी किती दिवस अपमान सहन करायचा?” असा संतप्त सवाल उपस्थित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय-अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने आज (२३ जून) सकाळी ११ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मोर्चा क्रांती चौकातून सुरू होऊन सिल्लेखाना, गुलमंडी मार्गे भडकल गेट येथे जाऊन समारोप होणार आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा दाखल झाला असून, त्यांनी ११ जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वापरलेल्या भाषेवरून ही कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांच्यावर अटक करण्यात आलेली नाही, ही बाब समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे.

या मोर्चामार्फत इम्तियाज जलील यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येणार असून, प्रशासनाकडून तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे. शहरातील वातावरण या पार्श्वभूमीवर चिघळू नये म्हणून पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,042 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क