राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल उचलले असून ‘Maha-AASTHA’ (Maharashtra Advanced Administrative System for Transparent Human Resource Administration) ही नविन डिजिटल प्रणाली २० जून २०२५ रोजी लागू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा इतिहास ऑनलाईन करण्यात येणार असून ही प्रक्रिया येत्या १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रणालीचा उद्देश नियुक्ती, बढती, बदल, प्रशिक्षण, निवृत्ती, रजा, शिक्षा आदी सर्व माहिती एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात संकलित करणे हा आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे सेवा विवरण तपासण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रशासनातील दिरंगाई कमी होणार आहे.
प्रत्येक विभागात ‘Maha-AASTHA सेल’ स्थापन करणे अनिवार्य असून, त्यासाठी एक नोडल अधिकारी नेमला जाणार आहे. या अधिकाऱ्यांचा तपशील ३० जूनपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. दर सोमवार या योजनेच्या प्रगतीचा अहवालही सादर करावा लागणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार सर्व सेवा कागदपत्रांचे स्कॅनिंग करून अपलोड करावे लागणार असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला अधिकृत ई-मेल आयडी देण्यात येणार आहे. विभागीय संरचना म्हणजेच Organogram देखील तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ही योजना १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेचा भाग असून, यामुळे राज्याच्या सर्व विभागांमध्ये एकसंध आणि पारदर्शक HR प्रणाली उभी राहणार आहे. सुमारे ३ लाखांहून अधिक कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
‘Maha-AASTHA’ मुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे कामकाज सुलभ होणार असून, सेवाविषयक प्रक्रियांमध्ये गती आणि अचूकता येणार आहे. प्रशासनात पारदर्शकतेकडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*