मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक सहाय्य दिले जाते. जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता १५ ऑगस्टपर्यंत लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही महिन्यांप्रमाणे यावेळीही त्याच कालावधीत निधी वितरित होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण असल्याने महिलांमध्ये दोन महिन्यांचे मिळून ₹३,००० एकरकमी मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे.

२०२४ मध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्यात आले होते. त्यामुळे यंदाही जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

त्यामुळे लाभार्थी महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे. १५ ऑगस्टपर्यंत हप्ता जमा होण्याची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

610 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क