राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आता अधिक पारदर्शक आणि कॉपीमुक्त होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळेचे विद्यार्थी असतील, त्या शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी परीक्षा केंद्रांवर नियुक्त केले जाणार नाहीत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विभागीय मंडळांना आदेश जारी करत परीक्षा प्रक्रिया निष्पक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
कॉपीमुक्त अभियानाची जोरदार अंमलबजावणी
या वर्षी परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त करण्याचा निर्धार शिक्षण मंडळाने केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी, आणि नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थी कॉपी न करण्याची शपथ घेणार असून, परीक्षेच्या वेळी कडक देखरेख ठेवली जाणार आहे.
शाळा आणि शिक्षक यांची ताटातूट करण्याच्या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*