दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे मार्ग खुले झाले आहेत. पहिल्या दिवशीच महाराष्ट्राला तब्बल 3 लाख 82 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा मोठा वाटा आहे.
छत्रपती संभाजीनगरसाठी तीन महत्त्वाचे येणारे उद्योग :
1. एबी इनबेव
- क्षेत्र: अन्न आणि पेये
- गुंतवणूक: 750 कोटी
- रोजगार निर्मिती: 35
2. अवनी पॉवर बॅटरिज
- क्षेत्र: इलेक्ट्रॉनिक्स
- गुंतवणूक: 10,521 कोटी
- रोजगार निर्मिती: 5000
3. जेन्सोल :
- क्षेत्र: इलेक्ट्रॉनिक्स
- गुंतवणूक: 4000 कोटी
- रोजगार निर्मिती: 500
या गुंतवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. रोजगार संधींमध्ये वाढ होऊन या भागातील आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील सामंजस्य करार महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेणारे ठरत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*