छत्रपती संभाजीनगर: शहरातील जालना रोडवरील वर्दळीच्या रस्त्यावर एका तरुणाने भरधाव बुलेटवर उभा राहून स्टंट करताना व्हिडिओ बनवला. सचिन लिपने असे या तरुणाचे नाव असून, त्याने इन्स्टाग्रामवर रील बनवून प्रकाशझोतात येण्यासाठी हा जीवघेणा स्टंट केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस कारवाईच्या भीतीने त्याने आपले इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहे.
सचिन लिपनेने भरधाव बुलेटवर उभे राहत हात पसरवून स्टंट केला. त्याच्या मागे देखील एक व्यक्ती बसलेला होता. हा स्टंट मोंढा नाक्याजवळील उड्डाणपूलावरून उतरताना करण्यात आला. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. स्टंट करताना काही विपरीत घडले असते, तर सचिन व त्याच्या साथीदाराचा जीव धोक्यात आला असता.
व्हिडिओ व्हायरल, नंतर अकाउंट डिलीट
सचिनच्या या व्हिडिओला सुमारे दीड लाख व्हिव्यूज मिळाले होते. अनेक युजर्सनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी त्याला जीवघेणा स्टंट न करण्याचा सल्ला दिला, तर काहींनी पोलिस कारवाईची भीती व्यक्त केली. अखेर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सचिनने इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले.
रील्सच्या नादात जीवाचा धोका
सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेक तरुण धोकादायक स्टंट करत आहेत. काही महिन्यांपूर्वी खुलताबाद येथे रील्स बनवण्याच्या नादात श्वेता सुरवसे या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला होता. अशा घटनांमुळे समाजामध्ये सोशल मीडिया प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.
पोलिस कारवाईची शक्यता
या प्रकारानंतर पोलिस संबंधित तरुणावर काय कारवाई करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी अशा धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर कठोर पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*