छत्रपती संभाजीनगर :  बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसापुरी गावात बेकायदेशीररीत्या तलवारी बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकत तीन लोखंडी तलवारी आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

ही कारवाई २१ जून रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता, तीन लोखंडी धारदार तलवारी आणि तलवारींची म्यान अशी साहित्य मिळून आले. या तलवारी अंदाजे ७७ सेंटीमीटर लांबीच्या असून, त्यांच्यावर लाल रंगाचे वरील बाजूस स्टील व सोनेरी डिझाईन असलेले कव्हर होते. या शस्त्रांची एकूण अंदाजे किंमत १५०० रुपये असल्याची माहिती आहे.

सदर आरोपीने शासनाने लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले असून, त्याच्याविरुद्ध हत्यार कायदा कलम 4/25 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, तपास सहाय्यक फौजदार अशोक बन्सीधर सोकटकर हे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,051 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क