छत्रपती संभाजीनगर : किराणा व्यवसायात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने तब्बल ६५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. सुरेश रामभाऊ घाटूळ (वय ३८) आणि त्याची पत्नी रविता सुरेश घाटूळ (रा. हनुमाननगर, गारखेडा) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.

फसवणूक झाल्याची तक्रार हनुमाननगर येथील रहिवासी किशोर बबनराव शिंदे यांनी दिली आहे. त्यांचा दूध व किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी अक्षय लेणेकर या पिग्मी एजंटच्या माध्यमातून त्यांची सुरेश घाटूळ याच्याशी ओळख झाली. सुरेशने स्वत:ला जयभवानीनगरमध्ये होलसेल किराणा विक्रेता असल्याचे सांगितले आणि मोठ्या प्रमाणात तेल व इतर किराणा साहित्य खरेदी केल्यास नफा होईल, असे आमिष दाखवले.

शिंदे यांनी सुरुवातीला नगदी व्यवहार करून माल खरेदी केला. पुढे विश्वास बसल्याने त्यांनी २२ लाख रुपये गुंतवले. यानंतर अन्य तक्रारदार प्रभाकर धोत्रे (५ लाख), नितीन बोराडे (१६ लाख), विजय शिंदे (१२ लाख), आणि अक्षय लेणेकर (१० लाख) यांच्याकडूनही पैसे घेतले गेले. एकूण ६५ लाख रुपये दांपत्याने उकळले.

तक्रारदारांनी पैसे मागितल्यावर सुरेश आणि रविता यांनी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. दिलेले धनादेश वठले नाहीत. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,391 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क