छत्रपती संभाजीनगर: रेल्वे खात्यात टीसी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे 8.5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
फिर्यादी शाम विनायकराव देवकर (वय 35, रा. गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) यांना रेल्वे खात्यात टीसी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी 8.5 लाख रुपये उकळले. आरोपींनी रेल्वे खात्याच्या बनावट लेटरहेडवर “जॉइनिंग लेटर” तयार करून ते खरे असल्याचे भासवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्यांच्याकडे पैसे दिले.
विलास कडूबा खरात, आप्पासाहेब पांडूरंग निळ, काकासाहेब आळींग आणि इतर साथीदारांनी बनावट कागदपत्रांची साक्षी दाखवून इतर व्यक्तींनाही नोकरी लावण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्या पैशांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार पुढील तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*