नांदेड: प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या नांदेड-पटणा, औरंगाबाद-पटणा, काचीगुडा-पटणा आणि सिकंदराबाद-पटणा या मार्गांवर चालणार असून प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक
1. नांदेड-पटणा विशेष गाडी (07721)
प्रस्थान: 22 जानेवारी 2025 रात्री 11:00
पुन्हा आगमन (पटणा ते नांदेड, 07722): 24 जानेवारी 2025 दुपारी 3:30
नांदेडला आगमन: 26 जानेवारी 2025 सकाळी 4:30
2. काचीगुडा-पटणा विशेष गाडी (07725)
प्रस्थान: 25 जानेवारी 2025 दुपारी 4:45
पुन्हा आगमन (पटणा ते काचीगुडा, 07726): 27 जानेवारी 2025 सकाळी 11:30
3. औरंगाबाद-पटणा विशेष गाडी (07101)
प्रस्थान: 19 आणि 25 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 7:00
पुन्हा आगमन (पटणा ते औरंगाबाद, 07102): 21 आणि 27 फेब्रुवारी 2025 दुपारी 3:30
4. सिकंदराबाद-पटणा विशेष गाडी (07105)
प्रस्थान: 7 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 5:00
पुन्हा आगमन (पटणा ते सिकंदराबाद, 07106): 9 फेब्रुवारी 2025 दुपारी 3:30
प्रमुख थांबे
पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपूर, इटारसी, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर मार्गे या गाड्या पटणा स्थानकावर पोहोचतील.
प्रवाशांना सूचना
या विशेष गाड्यांमध्ये 20-22 डब्बे असतील. महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*