छत्रपती संभाजीनगर :शहरात एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फुकट राशन मिळवून देण्याच्या बहाण्याने गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालनबाई लक्ष्मण क्षिरसागर (रा. स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी) यांची सोमवारी दुपारी पानदरीबा परिसरात तीन अनोळखी इसमांनी फसवणूक केली.
आरोपींनी फिर्यादीस फुकट राशन मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांना बाजूला नेले. त्यांनी फिर्यादीच्या छोट्या कापडी पिशवीतील 15,000 रुपयांचे कानातील सोन्याचे फुले (03 ग्रॅम), 15,000 रुपयांचे 30 मणी (02 ग्रॅम), 1 ग्रॅम सोन्याचा पत्ता, तसेच 1,500 रुपये रोख रक्कम मोठ्या प्लास्टिकच्या गोणीत ठेवल्याचा बनाव केला. त्यानंतर आरोपींनी कापडी पिशवी लंपास करून पळ काढला.
या प्रकारानंतर मालनबाई क्षिरसागर यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या जबाबानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार भाले पुढील तपास करत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*