पैठण तालुक्यात मंगळवारी (दि. ३) वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत हाहाकार माजला. या वादळाचा फटका वीज उपकेंद्रांनाही बसला असून, फारोळा उपकेंद्रातील वीज अचानक खंडित झाल्याने शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. तब्बल पाच तासांनंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला, मात्र या खंडामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे.
शहरातील पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले असून, आठवड्यातून एकदा पाणी मिळणाऱ्या अनेक भागांत आता आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होणार आहे. जलवाहिनी फुटणे, वीज पुरवठा खंडित होणे अशा विविध कारणांमुळे पाणीपुरवठ्यात सतत अडथळे येत आहेत. प्रत्येक आठवड्यात कोणता ना कोणता अडथळा येत असल्यामुळे शहरवासीयांतून संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव दोनच दिवसांवर असताना पाण्याची या प्रकारची अनियमितता नागरिकांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. पाणीपुरवठा विभाग जीर्ण झालेल्या योजनांच्या मर्यादेमध्ये काम करत असून, नागरिकांना आठवड्याच्या एका ठराविक दिवशी पाणी मिळेल याची शाश्वती देणे त्यांना अवघड झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*