पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची जोरदार आवक होत असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २७ पैकी १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीत तब्बल ९४३२ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणातील पाण्याची वाढती पातळी पाहता विसर्गाचे प्रमाण वेळोवेळी कमी-जास्त करण्यात येणार आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. “पाण्याचा प्रवाह वाढत असताना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा व आवश्यक ती काळजी घ्या,” असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क ठेवून संभाव्य परिस्थितीसाठी तयार रहावे, कारण विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*