shepherd-family-robbed-with-knife-threat-in-ambelohla

शेतात मुक्काम करणाऱ्या मेंढपाळ कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एक फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता आंबेलोहा ते कासोडा गाव शिवा जवळील शेतात घडली. सात जणांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एक लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ज्ञानेश्वर श्रीधर दिंडे (वय ३५, रा. दिंडेवाडी, ता. शेवगाव) आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या सहा दिवसांपासून आंबेलोहळ गावातील दत्तुआपा देसाई यांच्या शेतात मुक्काम करीत होते. एक फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजता, ओळखीचे बाळु देवगुणे आणि हरी देवगुणे आपल्या सात साथीदारांसह शेतात आले. त्यांनी लाकडी दांड्यांनी शिवाजी वाघमोडे, अंबिका वाघमोडे आणि साई काळे यांना मारहाण केली. प्रियंका काळे हिला चाकू दाखवून तिच्या कानातील १४ हजार ५०० रुपयांचे हुजराचे जोड, ७ हजार ५०० रुपयांचे बाजीगर, ३० हजारांची सोन्याची पोत, ज्ञानेश्वर दिंडे यांच्या कानातील १४ हजार रुपयांची बाळी, ७ हजार रुपयांचे चांदीचे ब्रेसलेट, अर्चना दिंडे याच्या गळ्यातील सोन्याची पोत, अंबिका घडामोडे पोत, नथ, रेवनाथ काळे यांच्या खिशातील १० हजारांची रोख रक्कम लंपास केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत लुटमार करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,097 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क