Oplus_131072

Goa to Sambhajinagar Bus Accident One Dead Over 30 Injured

गोव्याहून छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या खासगी आराम बसला करवीर तालुक्यातील कांडगाव येथे मध्यरात्री अपघात झाला. या दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील अमोल परशुराम भिसे यांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बस उलटून अपघात, मदतीसाठी धावले स्थानिक

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी कंपनीतील सुमारे 150 कर्मचारी गोव्याला सहलीसाठी गेले होते. सहल संपवून परतताना कोल्हापूरकडे जाणारी एक बस कांडगाव येथे तीव्र वळणावर उलटली. अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 30 जण जखमी झाले.

स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. बसमधील प्रवाशांना बाहेर काढून जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर आणि खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.

वेग, वळण की चालकाचा निष्काळजीपणा? पोलिस तपास सुरू

प्राथमिक तपासानुसार, तीव्र वळण आणि वेगामुळे बसवरील चालकाचा ताबा सुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, चालक झोपेत होता का? बसमध्ये कोणता यांत्रिक बिघाड होता का? याची चौकशी पोलिस करत आहेत.

दरम्यान, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी बस बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे. या घटनेने प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,863 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क