Oplus_131072

Youth Murdered in Sambhajinagar Near Police Station

छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर रविवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. कल्पेश विजय रूपेकर (बीसीएस विद्यार्थी) असे मृताचे नाव असून, या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

सीसीटीव्हीमुळे घटना उघड

क्रांती चौक पोलिसांनी पोलिस ठाण्यासमोरील बुद्धविहाराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटे तीन वाजता वैभव मालोदे आणि अन्य तीन जणांनी कल्पेशला मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. लाथा-बुक्क्यांनी झालेल्या हल्ल्यात कल्पेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

सीसीटीव्हीतील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कल्पेशाचा भाऊ अविनाश रूपेकर यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी वैभव मालोदे, वैभव गिरी, सौरभ भोले आणि प्रेम तीनगोटे यांना अटक केली आहे.

जुन्या वादातून हत्या?

प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वादातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत असून, या हत्येमागे आणखी काही कारण आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

कल्पेश रूपेकर यांच्या हत्येनंतर नातेवाईक आणि स्थानिकांनी घाटी रुग्णालयात आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी आक्रोश व्यक्त केला होता. शहरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

5,924 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क