शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे मंगळवारी रात्री २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. ही धक्कादायक घटना सिडको एन-४ परिसरातील सेंट्रल मॉलसमोर घडली. सात वर्षीय चैतन्य सुनील तुपे हा मुलगा आपल्या वडिलांसोबत फिरण्यासाठी बाहेर पडला असताना तिघा अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले.
मंगळवारी रात्री ८.३० वाजता चैतन्य आपल्या वडिलांसोबत सिडको परिसरात फिरण्यासाठी गेला होता. वडील पुढे चालत असताना चैतन्य मागे सायकलवर होता. त्याच दरम्यान काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून तिघेजण उतरले आणि वडिलांसमोरच चैतन्यला उचलून गाडीत घातले. ८.४५ वाजण्याच्या सुमारास ही कार जयभवानीनगरमार्गे कामगार चौकातून शहराबाहेर पळून गेली.
चैतन्य हरवल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी ८.४५ वाजता सोशल मीडियावर संदेश व्हायरल केला. त्यानंतर ९.४३ वाजता मुलाच्या वडिलांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा कॉल हसनाबाद परिसरातून आल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिसरातील हॉटेल्स बंद केली आणि नाकाबंदी लावली. ११.३० वाजता सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू झाले. चार तासांत १०० हून अधिक फुटेज तपासले, तरीही आरोपींचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, बिल्डरच्या बांधकाम साइटवरील कामगारांची चौकशी सुरू असून, पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*