Young man arrested for brandishing weapons in Instagram reels
संभाजीनगरमधील पाचोड परिसरात इंस्टाग्रामवर धारदार शस्त्र घेऊन रील शूट करणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. दहशत निर्माण करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी अटक करून संपूर्ण शहरात त्याची धिंड काढली आहे. तसेच, समाजमाध्यमांवर भाईगिरीचे व्हिडिओ पोस्ट करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या तरुणांना इशारा दिला आहे.
आजच्या तरुणाईमध्ये सोशल मीडियाची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाईक आणि कमेंट किती आल्या यावरून काही तरुण स्वतःला मोठे समजू लागले आहेत. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये घडला.
सोशल मीडिया गॅंगस्टर म्हणून ओळखले जाणारे या रील्स भाईंनी कमरेला कट्टा लावून, हातात कोयता घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमुळे परिसरात दहशत पसरली. काही वेळातच पोलिसांनी या गावगुंडांना शोधून ताब्यात घेतले. इंस्टाग्रामवरील त्यांचे रील पाहून त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर शहरभर त्यांची धिंड काढण्यात आली.
पाचोड पोलिसांनी या तरुणांची चौकाचौकात धिंड काढत, त्यांना पोलिस ठाण्यात आणले. सार्वजनिक ठिकाणी अशी कारवाई केल्याने, सोशल मीडियावर भाईगिरी दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला.
सोशल मीडियावर अशा प्रकारच्या दहशतीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना पाचोड पोलिसांनी ठणकावून सांगितले की, हिंसक आणि वाईट प्रवृत्तीचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. तसेच, भविष्यात अशा प्रकारे समाजात भीती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*