Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Case
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-4 एफ-1 भागातून बिल्डर सुनील तुपे यांचा सात वर्षांचा मुलगा चैतन्य तुपे याचे मंगळवारी (ता. ४) रात्री नऊ वाजता अपहरण झाले. तो सायकलवर खेळत असताना अज्ञात व्यक्तींनी त्याला कारमध्ये जबरदस्तीने बसवले. या घटनेनंतर संपूर्ण शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली.
अपहरणकर्त्यांनी चैतन्य तुपे याला छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोड, भोकरदन मार्गे माहोराकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या कारचा अपघात झाला. यात प्रमोद शेवैत्रे (रा. ब्रह्मपुरी, ता. जाफराबाद, जि. जालना) हा गंभीर जखमी झाला. त्याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच अपघाताच्या तपासात पोलिसांना चैतन्य तुपे अपहरण प्रकरणाची लिंक मिळाली.
त्यानंतर जालना पोलिसांनी प्रमोद शेवैत्रे याची चौकशी करून उर्वरित आरोपींची माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे जालना व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे छापा टाकला आणि चैतन्य तुपे याची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणी बंटी गायकवाड व हर्षल या दोघांसह प्रमोद शेवैत्रे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जालना पोलिसांनी दोघांना, तर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*