मराठवाड्यातील अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी आज सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतीचौक येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, मराठवाड्याचा अनुशेष गेल्या सात दशकांपासून कायम असून तो आता दोन लाख बत्तीस हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यांनी राज्य सरकारकडे हा अनुशेष तत्काळ भरून देण्याची मागणी केली.
२०२३ मध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना, राज्य सरकारने १६ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे कॅबिनेट बैठक घेऊन ४५,००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. तसेच उर्वरित निधीसाठी १४,००० कोटी रुपयांची वेगळी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या मते, या घोषणा करून एक वर्ष लोटले तरी मराठवाड्याला अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही.
या आंदोलनात प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सुनिल कोटकर, सतीश वेताळ, सचिन मिसाळ, रमेश गायकवाड, आशोक मोरे, आत्माराम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे तातडीने अनुशेष भरून काढण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*