महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत चक्क पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून अर्ज केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कन्नड तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या या योजनेअंतर्गत अर्ज पडताळणी सुरू असताना, 12 पुरुषांनी आपल्या आधारकार्डावर महिलांचे फोटो लावून अर्ज केले असल्याचे समोर आले आहे.
बालकल्याण विभागाने 30 ऑगस्ट रोजी अर्ज पडताळणीच्या वेळी हा घोटाळा उघडकीस आणला. या पुरुषांनी अर्ज करताना स्वतःच्या आधारकार्डाचा वापर करून महिलांचे फोटो अपलोड केले होते. सविस्तर तपास होणार नाही असा या व्यक्तींचा अंदाज होता, मात्र त्यांचा हा बनाव फसला आणि त्यांची फसवणूक उघड झाली. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हे एकमेव प्रकरण नसून, यापूर्वीही सातारा जिल्ह्यातील एका पुरुषाने 30 महिलांच्या आधारकार्डचा वापर करून लाडकी बहीण योजनेत 30 अर्ज दाखल केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पडताळणीदरम्यान 26 अर्जांशी एकच बँक खातं संलग्न असल्याचे उघड झाले होते. या घटनेमुळे आता सरकारने अर्ज पडताळणी प्रक्रियेत अधिक दक्षता घेतली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*