जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटल्यामुळे धरण प्रशासनाने धरणाचे सर्व दरवाजे पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी 9:30 वाजता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले असून, विसर्ग पूर्णतः थांबविण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे २७ पैकी १८ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले होते. मात्र, आता पाण्याची आवक कमी झाल्याने सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. यामुळे गोदावरी नदी पात्रात वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले असून, संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका कमी झाला आहे.
तरीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भविष्यात पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*