मंगळवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास शहरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास २० मिनिटे चाललेल्या या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले आणि नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. एमजीएम वेधशाळेने सायंकाळी ७ वाजेपर्यंत २१.९ मिमी पावसाची नोंद केली असून, हा गेल्या २४ दिवसांतला दुसरा मोठा पाऊस ठरला आहे. तसेच चिकलठाणा वेधशाळेने सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ४.२ मिमी पावसाची नोंद घेतली.
मंगळवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते आणि उकाडाही जाणवत होता, त्यामुळे पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दुपारी दीड वाजता काही मिनिटांसाठी रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर ४:३० वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि १५-२० मिनिटे जोरदार पाऊस पडला. सिडको, आकाशवाणी, गारखेडा, बेगमपुरा, छावणी आणि भावसिंगपुरा या भागांत पावसाचा जोर अधिक होता, तर चिकलठाणा परिसरात रिमझिम पाऊस झाला.
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर यांनी सांगितले की, पुढील तीन दिवस शहरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*