जायकवाडी धरणाच्या परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात ४१६९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरण ९९.७८ टक्क्यांपर्यंत भरले असून, पाण्याची पातळी १५२१.९६ फूट झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २५) पहाटे १ वाजता १२ दरवाजे, तर सकाळी ९.३० वाजता आणखी ६ दरवाजे उघडण्यात आले. सध्या एकूण १८ दरवाजे अर्धा फूट उंचीने उघडले असून, गोदावरी नदीपात्रात ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगावसाठी ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची ही वाढती पातळी लक्षात घेता गोदावरी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात ९ तारखेला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते, त्यानंतर १५ दिवसांनंतर पुन्हा एकदा धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसामुळे पाण्याचा वाढता प्रवाह पाहता, प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
विसर्गासाठी उघडलेले दरवाजे: गेट क्रमांक १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३, १२, २५, ११, २६, १३, २४, १५, २२, १७ आणि २०.
धरण प्रशासनाच्या या निर्णयामुळे गोदावरी काठच्या नागरिकांमध्ये चिंता पसरली असून, प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*