राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस दिव्यांग सेल तर्फे कांती चौकात आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांना दोन टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीवर उत्तर देताना अजित पवार यांनी अपमानास्पद टिप्पणी केली होती, ज्यावर दिव्यांग समाजात संताप उसळला आहे.
मुंबईत काही दिव्यांग व्यक्तींनी आरक्षणासाठी मागणी केली होती, त्याला उत्तर देताना पवार यांनी, “दिव्यांगांना आरक्षण दिलं, तर आम्ही काय शेतात काम करायला जावं का?” असा वक्तव्य करून दिव्यांगांचा अपमान केला होता. या वक्तव्याविरोधात शहर जिल्हा काँग्रेस दिव्यांग सेलने जोरदार निषेध नोंदवला.
या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी “अजित पवार माफी मागा” आणि “अजित पवार राजीनामा द्या” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी दिव्यांग काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सिर अन्सारी, शहर अध्यक्ष जकी मिर्झा, तसेच दीपाली मिसाळ, अनिस पटेल, डॉ. अरुण शिरसाठ, पवन डोंगरे, शेख कैसर बाबा, शेख शाहारुख, ऐश्वर्या थोरात, फैसल खान, शेख अजीम, फरवेज खान, जुनेद खान, वाहब चाऊस यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*