MSEDCL electricity bill recovery with police protection

छत्रपती संभाजीनगर: महावितरणच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी आता पोलिस बंदोबस्तात मोहिम राबवली जाणार आहे. ग्राहकांकडून थकीत वीज बिलांची वेळेवर भरपाई न केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा विरोधाचा सामना करावा लागतो. थकबाकीदार ग्राहकांकडून वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच मारहाणीच्या घटना घडत असल्याने महावितरण प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे.

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी थकबाकीदार ग्राहकांकडून थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी घरोघरी जाऊन संपर्क करत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी वीज बिल न भरल्यास वीज जोडणी तोडली जाते, यावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण जाते. अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून महावितरणने पोलिस बंदोबस्तात थकबाकी वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

महावितरणच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, कोणत्याही कर्मचाऱ्याला मारहाणीचा किंवा धमकीचा सामना करावा लागू नये, यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. ग्राहकांनी शांततेत आणि नियमांनुसार वीज बिल भरावे, अन्यथा कठोर उपाययोजना केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

710 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क