महापालिकेच्या यांत्रिकी विभागासाठी कोट्यवधी रुपयांच्या वाहनांची खरेदी करण्यात आली होती, मात्र अनेक वेळा ही वाहने काम नसल्याने उभीच राहतात. या समस्येवर तोडगा म्हणून महापालिका प्रशासनाने आता वाहने खासगी व्यक्तींना भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टॅंकर, टिप्पर, व्हॅक्युम व्हॅन, पोकलेन, जेटिंग मशीन यांसारख्या वाहनांचा समावेश आहे. यासाठी भाडे दर निश्चित करण्यात आले असून, नागरिकांनी मागणी केल्यास उपलब्ध वाहने भाड्याने दिली जाणार आहेत.
महापालिकेने जुनी वाहने लिलावात काढल्यानंतर महापालिका निधी आणि वित्त आयोगाच्या निधीतून नव्या वाहनांची खरेदी केली होती. या वाहनांचा वापर अतिक्रमण हटाव मोहिमा, पावसाळ्यापूर्वी नाल्यांतील गाळ काढणे यासारख्या कामांसाठी केला जातो. मात्र, अनेक वेळा ही वाहने न वापरता उभी राहतात. त्यामुळे यांचा उपयोग होण्यासाठी प्रशासनाने त्यांना भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे.
भाडे दर:
- टिप्पर्स (२८००० जीव्हीडब्ल्यू): ₹१२५ प्रति किमी
- टिप्पर्स (१८५०० जीव्हीडब्ल्यू): ₹९० प्रति किमी
- टिप्पर्स (९५०० जीव्हीडब्ल्यू): ₹५० प्रति किमी
- जेसीबी: ₹१२०० प्रति तास
- टॅंकर (५ हजार लिटर): ₹५० प्रति किमी
- टॅंकर (१० हजार लिटर): ₹९० प्रति किमी
- व्हॅक्युम मशीन: ₹१७०० प्रति ट्रिप
- स्वीपिंग मशीन (मोठी): ₹२००० प्रति तास
हे दर नागरिकांसाठी जाहीर करण्यात आले असून, महापालिकेच्या यांत्रिकी विभागाशी संपर्क साधून या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*