मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथून ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे आज अयोध्येकडे रवाना झाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते, तसेच गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत या यात्रेकरूंना छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून निरोप देण्यात आला. पालकमंत्री सत्तार यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला मार्गस्थ केले.
या प्रसंगी बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, “तीर्थयात्रा ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंददायी असते. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करून शासनाने ज्येष्ठांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.”
यावेळी गृह निर्माण मंत्री अतुल सावे, आमदार विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
विशेष रेल्वेने ‘जय श्रीराम’च्या जयघोषात ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येच्या तीर्थदर्शनासाठी रवाना झाले. या यात्रेसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सेवा, तसेच सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*