Unidentified Woman’s Body Found at Nath Sagar Dam
पैठण येथील नाथसागर धरण परिसरात छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा पंप हाऊसजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदरील महिला (३५ वर्षे) बेडशीटमध्ये गुंडाळलेली होती आणि तिच्या कमरेला दगड बांधण्यात आला होता, त्यामुळे हा खून असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही घटना आज (शनिवार) १ मार्च रोजी उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करण्यात आला. सदरील महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि घटनेचा तपास करण्यासाठी शेवगाव जिल्हा अहिल्यानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी तपास सुरू केला आहे. तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून महिलेच्या ओळखीबाबत आणि गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी विविध भागात तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*