छत्रपती संभाजीनगर : शहरातील भाजीपाला बाजारात दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ दाम्पत्याची तब्बल 2 लाख 40 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना घडली.
घटना कशी घडली?
फिर्यादी दिलीप कुमार पानचंद जैन (वय 69, रा. फ्लॅट नं. 105, सिल्व्हरनेट सोसायटी, दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर) हे काल सकाळी 11 वाजता पत्नीसमवेत सिग्मा हॉस्पिटलजवळील भाजीपाला मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. “येथे चोरीचे प्रकार वाढले आहेत, तुम्ही सोन्याचे दागिने काढून ठेवा” असे सांगून संशयितांनी फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील चार सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 2.5 तोळे सोन्याचे गंठण काढण्यास सांगितले.
यानंतर दोघांनी हातचलाखी करत सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ दाम्पत्याने जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे हे पुढील तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*