aurangabad-teen-kidnapping-mgm-hospital-police-investigation
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम हॉस्पिटलजवळ एक १९ वर्षीय तरुणाला ओळखीच्या व्यक्तींनी पाठलाग करून अडवले आणि गाडीत जबरदस्तीने कोंबून त्याचे अपहरण केले. मात्र बीड बायपास परिसरात त्याची सुटका झाली असून आरोपी फरार आहे. ही घटना शनिवारी (१ मार्च) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पुंडलिक नगर परिसरातून अपहरण झालेल्या चैतन्य तुपे याच्या अपहरणाला महिना उलटलेला नसताना दुसरी घटना समोर आल्याने शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
अपहरण झाल्यानंतर काही वेळाने मुलगा बीड बायपास रोडवर मिळून आला, मात्र अपहरण करणारे आरोपी अद्याप फरार आहेत. विशेष म्हणजे अपहरण करणारे हे तरुणाच्या ओळखीचे होते, मात्र त्यांची नावं अजून समोर आलेली नाहीत. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी तरुणास रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी नेले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. तूर्तास अपहरणकर्त्यांचे हेतू स्पष्ट झालेले नाहीत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*