Police Bust Bike Theft Gang, Seize Six Stolen Motorcycles

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान बीड बायपास रोडवरून एका इसमास संशयास्पद स्थितीत आढळून ताब्यात घेतले.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके आणि त्यांच्या पथकाने बीड बायपास रोडवर कारवाई केली. संशयित आरोपी अंबर उर्फ बाळू विठ्ठल देवकर (वय २८, रा. फरशी फाटा, ता. फुलंब्री) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे मोटारसायकलीबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी अधिक तपास केला असता, सदर मोटारसायकल त्याने छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केल्याचे कबूल केले.

यावर अधिक विचारपूस केल्यानंतर आरोपीने शहरातील तसेच खुलताबाद व लासूर स्टेशन परिसरातून अनेक मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी केलेल्या वाहनांचा साठा त्याने छावणी स्मशानभूमीत लपवून ठेवला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून एकूण ५.४० लाख रुपये किंमतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या.

तपासादरम्यान, क्रांती चौक, बेगमपुरा, वाळूज, एमआयडीसी वाळूज तसेच खुलताबाद आणि सिल्लेगाव पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी काही वाहनचोरीचे प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,003 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क