छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानात महाराष्ट्रातील दुसरे डिजिटल डोम थिएटर तारांगण उभारण्यात आले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.

आज प्रशासक श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत तारांगणचा पहिला प्रीमियर शो संपन्न झाला. यावेळी ०४ कक्षाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शहर अभियंता ए.बी. देशमुख, उपआयुक्त अंकुश पांढरे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, माजी महापौर प्रकाश निकाळजे, माजी नगरसेवक गौतम खरात, शिक्षण समन्वयक गणेश दांडगे आणि मनपा शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

उद्यानाची उभारणी १९९६ मध्ये करण्यात आली होती, परंतु देखभाल आणि सुरक्षा अभावी उद्यानाचा लाभ नागरिकांना मिळत नव्हता. प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानाचा सर्वांगीण विकास करण्यात आला आहे. येथे ओपन जिम, लहान मुलांचे खेळ, स्वच्छतागृह, बेंचेस, शोभिवंत झाडे आणि साहसी खेळांचा समावेश आहे.

डिजिटल डोम थिएटर प्लॅनेटेरियम केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना” अंतर्गत उभारण्यात आले आहे. या ४० फूट व्यासाच्या थिएटरद्वारे नागरिकांना खगोलीय माहिती मिळणार आहे.

उद्यानात साहसी खेळांचा देखील समावेश असून, झिप लाईन, बंजी इजेक्टर आणि स्काय सायकल यासारखे खेळ उपलब्ध आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,240 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क