बीड बायपास परिसरातील स्वप्नपूर्ती एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या आदिश्री त्र्यंबक जाधव (वय १२) या आठवीच्या विद्यार्थिनीने सोमवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे पाचच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गेल्या दोन दिवसांत शहरात शाळकरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या सलग घटनांनी खळबळ उडाली आहे. रविवारी बारावीचा विद्यार्थी साहिल शीलवंत नांदेडकरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर, आदिश्रीने सोमवारी हा टोकाचा निर्णय घेतला.

आदिश्रीचे वडील, त्र्यंबक जाधव, मथुरा येथे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलसह अस्थिरोगतज्ज्ञ होते. त्यांचे २०१६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आदिश्रीची आई बीएचएमएस डॉक्टर असून मोठा भाऊ सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे आदिश्रीने घराच्या समोरील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,391 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क