भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, श्रीमती विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. या नियुक्तीमुळे त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार आहे.
विजया रहाटकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून प्रभावी कामगिरी केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमा, प्रज्ज्वला, सुहिता अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात आल्या होत्या. त्यांच्या या अनुभवामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नेमले आहे.
राष्ट्रीय महिला आयोग हे संवैधानिक संस्था असून, महिलांच्या हक्कांसाठी काम करणारी एक प्रभावी संस्था आहे. त्याचे प्रमुख कार्य महिलांच्या समस्या सोडविणे, महिला सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचविणे, तसेच महिलांविषयक धोरणांसाठी केंद्र व राज्य सरकारांना मार्गदर्शन करणे आहे.
विजया रहाटकर यांचा विविध क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने त्यांची असलेली वचनबद्धता यामुळे त्यांच्या नियुक्तीला व्यापक मान्यता मिळत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*