शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या ६५ उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर केली आहे. या यादीत अनेक प्रतिष्ठित नेते आणि नवनिर्वाचित चेहऱ्यांचा समावेश आहे. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाणे मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी देऊन मोठं पाऊल उचललं आहे.
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना संधी मिळाली आहे. यासह, अन्य महत्त्वाच्या मतदारसंघांमधून ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची निवड केली आहे.
पहा संपूर्ण उमेदवारांची यादी :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सचिव अनिल देसाई यांनी ही यादी अधिकृतपणे जाहीर केली असून, ठाकरे गटाने आगामी निवडणुकीत जोरदार तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
यादीत ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील उमेदवारांचा समतोल साधण्यात आला असून, निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गट एक मजबूत आव्हान उभं करत असल्याचं दिसत आहे. आगामी काळात आणखी काही उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*