येत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. एसटीने यंदा कोणतीही भाडेवाढ न करता प्रवाशांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे ‘लालपरी’तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास किफायतशीर आणि सोयीस्कर ठरणार आहे.
प्रवासात होणार सुटसुटीतपणा
दिवाळी सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी जाण्यासाठी एसटी बसची निवड करतात. या वाढत्या प्रवासाच्या मागणीमुळे दरवर्षी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी २७ ऑक्टोबरपासून छत्रपती संभाजीनगर विभागातून जादा बस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे.
पुण्यासाठी सर्वाधिक बस
छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावरील प्रवाशांची संख्या दरवर्षी प्रचंड असते. त्यामुळे यंदा २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पुण्यासाठी १९ जादा बस सोडण्यात येणार आहेत. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त पुण्याला येणाऱ्या आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूर, अमरावती, अकोला या मार्गांवरदेखील अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण यांनी दिली.
दिवाळी नंतरही जादा बस सुरू
दिवाळीनंतरही प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या कालावधीत देखील जादा बस सेवा सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून दिवाळी सणाचा आनंद वाढणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*