छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिसांनी तडीपार गुंडासह चौघांना घरफोडीप्रकरणी अटक करून ९.२३ लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

२२ मार्च रोजी फिर्यादी विजेंद्र खरात (रा. गारखेडा) कुटुंबासह अंत्यविधीसाठी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १२.४३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. परतल्यावर त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी तपास केला. कपाटावर रक्ताचे डाग आढळल्याने संशयितांची तपासणी करण्यात आली. अली उर्फ निप्पल खान (रा. हनुमाननगर) याच्या हातावर ताजी जखम दिसली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत अली खानने साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली. अझमर उर्फ लंब्या मोहम्मद सरवर, अफरोज गुलाब शेख आणि सोहेल मोहम्मद सरवर या तिघांचा सहभाग उघड झाला. चौघांकडून ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

आरोपींचा गुन्हेगारी इतिहास:

1. अझमर मोहम्मद सरवर: ९ गंभीर गुन्हे; तडीपार

2. अफरोज शेख: ७ गंभीर गुन्हे

3. सोहेल सरवर: ३०२ (खून) आणि १५ गुन्हे

 

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. तपास अधिकारी प्रशांत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. उर्वरित मुद्देमाल शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,131 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क