छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नल चौकात गुरुवारी एका इलेक्ट्रिक स्कूटीमधून अचानक धूर निघाल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
पैठण तालुक्यातील वरवंडी गावातील भगवान चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 12 महिन्यांपूर्वी बजाज चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटी खरेदी केली होती. आज सकाळी वरवंडी गावातून स्कूटी टोचन करून शहरातील शोरूममध्ये सर्व्हिसिंगसाठी आणत असताना हायकोर्ट चौकात स्कुटी मधून अचानक धूर निघू लागला.
घटनेदरम्यान चौकात उपस्थित असलेल्या महिला ट्रॅफिक पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशामक विभागाला पाचारण केले. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा फवारा मारून गाडीतून निघणारा धूर आणि संभाव्य आग विझवली. ही प्रक्रिया तब्बल 30 मिनिटे चालली.
वाहतूक कोंडीमुळे त्रास:
या घटनेमुळे जालना रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. सुमारे पाऊण तासापर्यंत रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली, ज्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह:
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*