छत्रपती संभाजीनगर: जवाहरनगर पोलिसांनी मंगळसूत्र हिसकावणाऱ्या कुख्यात दोघा आरोपींना अटक केली आहे. त्यांनी जवाहरनगर, उस्मानपुरा आणि पुंडलिकनगर परिसरात एकूण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या दोघांकडून १२७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रे, दोन चोरीच्या दुचाकी, तसेच एकूण ९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांनी ही माहिती दिली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमोल वैजनाथ गलाटे (वय ३०, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) आणि मंगेश वाल्मीक शहाणे (वय १८, रा. पैठण) यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात देशमुखनगर येथे मौनल देशपांडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी हिसकावले होते. तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधून अमोल गलाटे याचा सहभाग स्पष्ट झाला. पोलिस कर्मचारी मारोती गोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अमोल जालना येथे आपल्या आईला भेटण्यासाठी जाणार असल्याचे समजले.

जवाहरनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्वरित कारवाई करत आरोपींना जालन्यातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी जवाहरनगर हद्दीतील ७ आणि पुंडलिकनगर व उस्मानपुरा हद्दीतील प्रत्येकी २ असे एकूण ११ गुन्ह्यांची कबुली दिली.

अमोल गलाटेवर यापूर्वीच ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, त्याच्यावर एमपीडीए (गुंडगिरी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त काँवत यांनी दिली.

या कारवाईत पोलिस अंमलदार मारोती गोरे, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, सहायक उपनिरीक्षक गजेंद्र शिगाने, हवालदार क्षीरसागर आणि बनकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,191 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क