गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातील गट नंबर १३९ मधील जमिनीच्या मोजणीसाठी ३५ हजार रुपयांची लाच स्विकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक व शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने तांदुळवाडी (ता. गंगापूर) येथील गट नंबर १३९ मधील जमीन विक्री केली होती. सदर जमिनीची मोजणी करून हद्दीचे खुणे लावून नकाशा तयार करण्यासाठी गंगापूर येथील भूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालयातील शिपाई संदीप लक्ष्मण फतपुरे (वय ४१, राहणार – जय भवानीनगर, छत्रपती संभाजीनगर) व भूमापक उमेश जळबाजी गायकवाड (वय ४०, राहणार – अलोक नगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तडजोडीनंतर ३५ हजार रुपयांवर हा व्यवहार ठरविण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठरवलेल्या सापळ्यानुसार, भूमापक गायकवाड यांनी १३ डिसेंबर रोजी पस्तीस हजार रुपये घेतल्यावर सह पंचांच्या साक्षीने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे, विजय वगरे, हेडकॉन्स्टेबल नागरगोजे, पोलीस कर्मचारी तोडकर व बागुल यांनी केली.
या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*