गंगापूर येथील भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये, सेंट फ्रान्सिस डिसेल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव फादर विल्फ्रेड मार्टिन सालढाणा (वय ७५) यांना ३ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
अनुकंपा तत्त्वावर शाळेत रुजू झालेल्या तक्रारदाराच्या नावाचा समावेश शालार्थ प्रणालीत करण्यासाठी व वेतन सुरू करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट एसीबीकडे तक्रार नोंदवली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई:
१० डिसेंबर रोजी तक्रार पडताळणीच्या वेळी आरोपीने तक्रारदाराकडून कामासाठी ३ लाख रुपये मागणी केली. ठरल्याप्रमाणे गुरुवारी तक्रारदाराकडून पैसे घेतल्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने आरोपीला रंगेहात पकडले.
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस व विजयमाला चव्हाण यांनी पार पाडली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*