छत्रपती संभाजीनगर ; सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या सिमरन परसराम बाथम (वय २९, रा. सिंधी कॅम्प, ग्वालियर, मध्य प्रदेश) या गर्भवती तरुणीचा पतीने संशयातून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. पती जहीर नजीर शेख (वय २०, रा. जोगेश्वरी) व सासू नाझिया नजीर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिमरनने जहीरसोबत नोटरी पद्धतीने २२ जून २०२४ रोजी विवाह केला होता. ती दोन महिन्यांची गर्भवती असताना, पोटातील बाळ आपले नाही या संशयातून पती तिला व तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या चार वर्षीय मुलाला वारंवार मारहाण करत होता. या त्रासाबाबत सिमरनने तिच्या आईला व्हिडीओ कॉलद्वारे माहिती दिली होती.
नोव्हेंबर महिन्यात सिमरन माहेरी गेल्यावर तिने आपल्या पतीने पैशासाठी पुरुषांशी संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली, तसेच नकार दिल्यास मारहाण केल्याचे सांगितले. तिची सासू देखील या छळाला सहकार्य करत असल्याचा खुलासा तिने केला होता.
१९ डिसेंबर रोजी सिमरनने आईला व्हिडीओ कॉल करून, पती व सासूने तिला पोटात लाथा मारत जबरदस्तीने काहीतरी खायला दिल्याचे सांगितले. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सिमरनला मृत घोषित करण्यात आले.
घटनेनंतर सिमरनच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी तत्काळ आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. २२ डिसेंबर रोजी पती जहीर शेख व सासू नाझिया शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत. सिमरनच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*