छत्रपती संभाजीनगरः हर्षनगर परिसरात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून ३९ वर्षीय रणजित सुधाकर दांडगे यांची एका नशेखोराने चाकूने भोसकून निघृण हत्या केली. या घटनेमुळे शहरातील नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
टी.व्ही. सेंटर परिसरात राहणारे रणजित दांडगे हे नारेगावातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. सासुरवाडीकडील एका कुटुंबीयाचा वाढदिवस असल्याने ते बुधवारी सायंकाळी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास ते परिसरातील एका दुकानात पायी जात असताना एका नशेखोराने त्यांना अडवले.
रणजित यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, हल्लेखोराने नाहक वाद घालत त्यांचा पाठलाग केला आणि काही अंतरावर चाकू काढून थेट छातीवर वार केला. गंभीर अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु छातीवर खोलवर वार झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर हर्षनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या नशेखोरीच्या घटना शहरासाठी चिंताजनक बनल्या आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*