छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात थंडीचे पुनरागमन झाले असून, मागील आठवड्याच्या तुलनेत तापमान सात अंशांनी घसरले आहे. त्यामुळे नागरिकांना थंडी जाणवू लागली आहे. शुक्रवारी (३ जानेवारी) किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.
गेल्या आठवड्यातील थंडीचा आढावा
गेल्या महिन्यात पंधरा दिवस थंडीची तीव्रता जाणवली, तर उर्वरित दिवसांमध्ये ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा अनुभव आला. मात्र, मागील दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. गुरुवारी कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस होते, तर शुक्रवारी हे तापमान ३१.३ अंश सेल्सिअसवर आले. दिवसभर सौम्य थंडी राहिली, पण सायंकाळी थंड वाऱ्यामुळे वातावरण गारठले.
जानेवारीत थंडी वाढण्याचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सकाळी व सायंकाळी गारवा अधिक जाणवत असून, पहाटेपासून ९ वाजेपर्यंत थंडीचा कडाका असतो. सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा गारठा जाणवत आहे.
३६ दिवसांत आठ वेळा तापमानात घट
२९ नोव्हेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत आठ वेळा पारा मोठ्या प्रमाणावर घसरला. १५ डिसेंबर रोजी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. १६ व १९ डिसेंबर रोजी तापमान अनुक्रमे ९.६ आणि ९.७ अंश सेल्सिअस होते. सध्याच्या घसरत्या तापमानामुळे थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*