पैठण : मागील पाच वर्षांपासून बंद असलेले पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान येत्या २६ जानेवारीपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या उद्यानाची गेल्या काही वर्षांत दुर्दशा झाली होती. उद्यान बंद असल्याने त्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. यामुळे उद्यानाच्या पुनर्बांधणीसाठी खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास बापू भुमरे यांनी प्रयत्न करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीची तरतूद केली होती.
मात्र, उद्यानातील विविध संगीत कारंजे आणि इतर विकासकामांमध्ये विलंब होत असल्याने उद्यान सुरू करण्याची तारीख वारंवार पुढे ढकलली जात होती. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारींची दखल घेत संबंधित विभागाला तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
२६ जानेवारी रोजी उद्यान खुले होणार
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संपूर्ण कामे पूर्ण करून २६ जानेवारीपासून उद्यान सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी स्वामी यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
बैठकीस खासदार संदीपान भुमरे, मुख्य अभियंता गवळी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बनीवार, उद्यान अभियंता दिलीप डोंगरे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, तसेच माजी नगरसेवक, उद्यानप्रेमी नागरिक आणि संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्यानाचे पुनरुज्जीवन पर्यटकांसाठी आनंददायी ठरणार
सुमारे १९० एकर क्षेत्रात पसरलेल्या या उद्यानाचे पुनरुज्जीवन होणे, पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*