छत्रपती संभाजीनगर : वाळूज आणि सातारा पोलिसांनी सराईत वाहन चोरांविरोधात प्रभावी कारवाई करत एकूण १० चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेल्या महागड्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

वाळूज पोलिसांची कामगिरी – ६ मोटारसायकली जप्त

वाळूज पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक करून त्याच्याकडून ६ महागड्या मोटारसायकली हस्तगत केल्या. तक्रारदार सुमनबाई साळुंके यांच्या बजाज पल्सर मोटारसायकल (MH.20.FE.7432) चोरीला गेल्याची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सुरेश भिमा मल्ले (वय २६, रा. जेऊर, अहमदनगर) याला लांझी रोडवरून अटक करण्यात आली. आरोपीकडून यामाहा R15 आणि पल्सरसह इतर ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

सातारा पोलिसांची कारवाई – ४ मोटारसायकली हस्तगत

सातारा पोलीस ठाण्यात शेख शमीम शेख आजमोद्दीन यांनी त्यांच्या होन्डा शाईन मोटारसायकल (MH.20.GT.4207) चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांच्या पथकाने आरोपी विशाल प्रकाश आवारे (वय १९, रा. बोकुड, पैठण) याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने कांचनवाडी व देवळाई परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून ३ मोटारसायकली, तर दुसऱ्या आरोपी अभय जाधवकडून एक मोटारसायकल असा एकूण १.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

वरिष्ठांचे मार्गदर्शन व पुढील तपास सुरू

या कारवायांमध्ये वाळूज पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, तर सातारा पोलिसांनी पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांच्या नेतृत्वाखाली चोरी उघडकीस आणली.

दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडून आणखी चोरीच्या मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

550 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क