छत्रपती संभाजीनगर: अलखैर बैतुल माल नागरी सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात प्रसारित झालेल्या आमच्या बातमीमध्ये टायपिंगच्या चुकीमुळे गैरसमज निर्माण झाल्याचे आम्हाला कळविण्यात आले आहे. यामुळे संस्थेचे व्यवस्थापक आणि नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
मूळ प्रकरणानुसार, व्यवस्थापक सय्यद हबीबउल्लाह सय्यद अहमदउल्लाह हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आमच्या बातमीच्या मुळ स्वरूपात टायपिंगच्या चुकीमुळे असे वाटण्याची शक्यता निर्माण झाली की व्यवस्थापकांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही या प्रकाराबद्दल क्षमस्व आहोत आणि संबंधित बातमीमध्ये योग्य दुरुस्ती केली आहे. तसेच, व्यवस्थापक फसवणुकीचा बळी ठरलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी पुढे सरसावले असून, त्यांनी या प्रकरणात पोलिसांना सहकार्य केले आहे.
आमच्या वाचकांनीही या घटनेमुळे झालेल्या गैरसमजाविषयी समजून घ्यावे, अशी विनंती आहे. आम्ही भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेऊ.
– द छत्रपती संभाजीनगर न्यूज